तया ठायी जाता शुध्द
3679.
तया ठायी जाता शुध्द होय अमृत । नारदे ही मात सांगितली ॥१॥ तेव्हा एकादशी आली सोमवारी । विमान पंढरीं उतरले ॥२॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारे ॥३॥ देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी उभा असे ॥४॥ सुरवर देव बैसले समस्त । कीर्तनी नाचत नामदेव ॥५॥ एका जनार्दनी देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥६॥
