वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 143. चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८

चोखामोळाचरित्र - अभं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087411 · अभंग क्र. ३६७७

3677.
चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥ नारदाते प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हे अमृत कोठे होय ॥२॥ सांगे तये वेळीं ऐका हे भूतळीं । सांगेन नव्हाळी तुम्हांपाशीं ॥३॥ पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी । पुंडलिकाचे द्बारीं देव उभा ॥४॥ अनाथाचा नाथ विटेवरी उभा । एका जनार्दनी गाभा लावण्याचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग