ऐसा समुदाव चंद्रभागे
3680.
ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हा आपुले घरी चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जागरण निशीमाजीं ॥२॥ तीन प्रहर जाहले उपवास जागरण । चोखामेळा म्हणे स्त्रीसी तेव्हा ॥३॥ तुझिया घरासी येऊ पारण्यासी । सांगून मजसी गेला देव ॥४॥ एका जनार्दनी चोखा करी करुणा । तेव्हा नारायणा जाणवलें ॥५॥
