वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळण)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079923 · अभंग क्र. ३६७९

3679.
(गौळण)
या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहंळा आजि वृंदावनीचा ॥१॥
वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनी चित्त झाले चंचळ ॥धृपद॥
उरले ते सांडा काम नका करू गोवी । हीच वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचे श्रीमुख पाहाता । बोलती ते आता घरची सोसू वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड काही नावडे आणीक । लाज तरी लोक मन झाले उदास ॥४॥
एकाएकी चालिल्या सादावीत सवे । तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय ॥५॥

अर्थ :
गोकुळातील गोपिका ऐमेकांना म्हणु लागल्या बायांनो, या. आपण सार्‍याजनी जाऊ आणि वृंदावनी काल्याचा सोहंळा पाहू. भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवित आहे. त्या वेणुनाद कानी पडला व त्यामुळे तिकडे जाण्यासाठी मन आतुर झाले आहे. हा विलंब मला सहन होत नाही. संसारातील काम राहीले असतील तर राहुद्यात. त्यात अडकून राहु नका; कारण मानवी आयुषातील श्रीकृष्णभेटीची हीच वेळ आहे, मला याची खत्री आहे. भगवान श्रीकृष्णचे रूप बघुन डोळे निवतील. घरची अडचणी आणणारे कामे तशीच सोसु. कृष्णभेटिच्या आड आलेले काहीही, कोणीही मला सहन होत नाही. लोक मर्यादा पाळावी हे जरी खरे असले, तरि मला ते मान्य नाही. संसाराविषयी माझे मन उदास झाले आहे. त्याला काय करावे ?. तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका एकमेकिंना वृंदावानात येण्यासाठी सूचना देत जात आहेत; कारण भगवंतने आपल्या सुंदर, सुकुमार रूपाने त्यांना तद्रूप करुण टाकले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग