(काला)
3693.
(काला)
आता ऐसे करू । दोघा धरूनिया मारू ॥१॥
मग टाकिती हे खोडी । तोंडी लागली ते गोडी ॥धृपद॥
कोंडू घरामधी । न बोलोनि जागो बुद्धी ॥२॥
बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥
अर्थ :
आपण आता त्या नंदाच्या मुलाला आणि तुक्याका चांगला मार देऊ. मगच ते ही चोरी करण्याची वाइट खोड टाकून देतील त्यांना दही-दुधाची चटक लागली आहे. ते चोरी कण्यासाठी घरात आले की आपण त्याना कोंडुन ठेउ. तुकाराम महाराज म्हणतात, की मी साऱ्या सवंडयांना गोळा केले आहे आणि देवाला बोलावितो आहे.
