वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(काला)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079922 · अभंग क्र. ३६९०

3690.
(काला)
पळाले ते भ्याड । त्यांसि येथे झाला नाड ॥१॥
धीट घेती धणीवरी । शिंकी उतरितो हरी ॥धृपद॥
आपुलिया मती । पडली विचारी ती रिती ॥२॥
तुका म्हणे घ्या रे पया । कै पावाल या ठाया ॥३॥

अर्थ :
जे घाब्रट होते, ते पळून गेले. त्यांचा भित्रेपणा त्यांच्या हिताच्या आड आला. हरीने शिंकाळी उतरवली. जे धाडसी होते, त्यांना भरपूर मिळाले. जे स्वतः च्या बुध्दीने विचार करात बसले, ते उपाशी राहिले. तुकाराम महाराज म्हणतात, अरे' तुम्ही 'दूध घ्या पुन्हा इथे कधी यायला मिळणार आहे?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग