वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(घोंगडीची रूपके)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079708 · अभंग क्र. ३६५६

3656.
(घोंगडीची रूपके)
खेळो लागलो सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥
कान्होबाचे पडिलो गळा । घेई गोपाळा देई झाडा ॥धृपद॥
मी तो हागे उघडा जालो । अवघ्या आलो बाहेरी ॥२॥
तुका म्हणे बुद्धी काची । नाही ठायीची मजपाशी ॥३॥

अर्थ :
एकदा आम्ही सर्व मुले मुले भजन किर्तन भक्तीचा सुरफोडीरुपी खेळ खेळू लागलो त्यावेळी माझी घोंगडीच हरवली माझा देहभाव नाहीसा झाला. त्यावेळी मी कान्होबाच्या गळयात पडलो आणि त्याला म्हणालो की हे गोपाळा तू माझा स्वीकार कर आणि माझ्याकडे कोणत्या उपाध्या राहिल्या आहेत याविषयी तू माझा संपूर्ण हिशोब घ्यावा. देवा मी आता कसा उघडा झालो आहे म्हणजे सर्व उपाधी विकारातून बाहेर पडलो आहे व सर्व उपाध्यांच्या बाहेर मी आलो आहे ते पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी बुध्दी अगदी शुध्द आहे आणि जी स्थिती मी तुला सांगत आहे तीच अगदी सत्य आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग