वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

गोरियाच्या वाडा संत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087370 · अभंग क्र. ३६५५

3655.
गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टी सर्व ॥१॥
देउनी आसन बैसविलें संता । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥
कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥
ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तंव ते लगबगा धांवे कांता ॥४॥
स्त्रियेसहित नाही तेथे कुंभकार विठा । एका जनार्दनी वांटा गेला कवणें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग