माझा शकुन ऐका भाई ।
3691.
माझा शकुन ऐका भाई । चार वेददेती ग्वाही । सहा शास्त्रं वदती पाही । तेचि धरूनीरहा ॥१॥ सावध नाना सावध नाना । समज कांहीतरी धरी मना ॥धृ.॥ नका जाऊ आडवाटे । तेथे'लागती चपेटे । दांत विचकुनी पडसी नेटे । उगेचपहा ॥२॥ गेले सरले मागील फेरे । आता दिवसआले बरे । विघ्न नाहींसे जाले सारें । सावध रहा ॥३॥ एका जनार्दनींचा जोशी । होरा सांगतोसंतांसी । ऐकता जातील मोक्षपदासी । नायकतापडतील चौऱ्याऐंशी । हेंचि पहा ॥४॥
