वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(घोंगडीची रूपके)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079554 · अभंग क्र. ३६५९

3659.
(घोंगडीची रूपके)
तुम्हा आम्हा उरी तोवरी । जनाचारी आहे तैसी ॥१॥
माझे घोंगडे टाकुन देई । एके ठायी मग असो ॥धृपद॥
विरोधाने पडे तुटी । कपट पोटी नसावे ॥२॥
तुका म्हणे तू जाणता हरी । मज वेव्हारी बोलविसी ॥३॥

अर्थ :
देवा आपल्या दोघामध्ये भेद तोपर्यंतच आहे जोपर्यंत मी लोकांमध्ये व्यवहार करत आहे. देवा तू माझी घोंगडी टाकून दे मग पाहा आपल्या दोघात ऐक्य कसे होते व आपण कसे एकरुप होतो ते. देवा जर एकमेकामध्ये विरोध घडला तर दोघामध्ये अंतर पडते त्यामुळे कोणाच्याही पोटामध्ये कपट नसावे म्हणजे दोघाचेही ऐक्य होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी तू सर्वकाही जाणता आहेस परंतू मला व्यवहारामध्ये गुंतवून व्यवहारासंबंधीच बोलण्यास लावतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग