वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079768 · अभंग क्र. ३५५४

3554.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काही चिंतेविण । नाही उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुम्हा झाला भार ॥धृपद॥
आली काही तुटी । गेली सुटोनिया गाठी ॥२॥
तुका म्हणे घरी । बहु बैसले रिणकरी ॥३॥

अर्थ :
काहीतरी चिंता असल्याशिवाय शीण उत्पन्न होत नाही. देवा तुम्हाला माझा भार झाला असावा त्यामुळेच तुम्हाला माझा विसर पडला असावा. देवा तुम्हाला आमच्यापासून काहीतरी तोटा झाला असावा त्यामुळेच तुम्ही आम्हाला तुमच्यापासून थोडे बाजूला केले असावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा किंवा तुझ्या घरापुढे तू ज्यांच्याकडून सेवारुपी ऋण घेतले असे तुझे भक्त तुझ्या घरापुढे बसलेले असावेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग