(पंढरीस जाणाऱ्या वार
3561.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
समर्थाचे पोटी । आह्मी जन्मलो करंटी ॥१॥
ऐसी झाली जगी कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥धृपद॥
येथे नाही खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥२॥
तुका म्हणे जिणे । आता खोटे जीवेपणे ॥३॥
अर्थ :
देवा तुझ्यासारख्या सर्वसमर्थाच्या पोटी आम्ही करंटी मुले जन्मलो आहोत. देवा अशी किर्ती तुझी जगामध्ये झाली असून तुझ्या नामाची अशा प्रकारे फजिती झाली आहे. अहो या देवाच्या घरी खाण्यासाठी काहीच नाही त्यामुळे तर त्याच्या पोरांना कोणी मूळ पाठवित नाही किंवा त्यांना नेण्याकरताही कोणी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशी तुझी किर्ती झाली असून आता आमचा जीवपणा आम्ही राखून आम्ही जगावे हे देखील आता खोटेच झाले आहे.
