वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079732 · अभंग क्र. ३५६२

3562.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
पुढे तरी चित्ता । काय येईल ते आता ॥१॥
मज सांगोनिया धाडी । वाट पाहातो बराडी ॥धृपद॥
कंठी धरिला प्राण । पायापाशी आले मन ॥२॥
तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आता ॥३॥

अर्थ :
आता यापुढे देवा तुमच्या चित्तामध्ये काय येईल काय माहित. देवा आता तरी कोणाच्या हाती तू मला पंढरीला येण्यासाठी निरोप धाड मी भिकाऱ्यासारखा तुझा निरोप येण्याची वाट पाहात आहे. देवा कंठात प्राण धरुन मी राहीलो आहे माझे मन तर केव्हाच तुमच्या पायापाशीच आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता यापुढे तू माझ्याबाबतीत काय निर्णय घेशील याचीच मला खूप चिंता वाटत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग