वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 138. श्रीमुक्ताईची स्तुति - अभंग ३५४० ते ३५४५

अजानवृक्षांची पाने ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084816 · अभंग क्र. ३५४४

3544.
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेके । तो होय ज्ञानी अधिकें । येथे संशय नाही ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाही ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पै सार । येथे संशय नाही ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथे संशय नाही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग