(पंढरीस जाणाऱ्या वार
3573.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता आशीर्वाद । माझा असो सुखे नांद ॥१॥
म्हणसी कोणा तरी काळे । आहेतसी माझी बाळे ॥धृपद॥
दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥
नेसी कधी तरी । तुका म्हणे लाजे हरी ॥३॥
अर्थ :
देवा तू सुखाने नांद असा आशिर्वाद माझा तुला आहे. देवा तू कधीतरी आमच्याविषयी कोणाजवळ तरी म्हणणार आहेस की ही माझी बाळे आहेत. देवा आम्ही तुझ्यापासून कितीही दूरदुरांतरात असलो तरी तू आमचा कधीतरी क्षेमसमाचार घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी तुला कधीतरी लाज वाटेल आणि कधीतरी तू आम्हाला पंढरीला नेशीलस.
