(पंढरीस जाणाऱ्या वार
3552.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
का माझे पंढरी न देखती डोळे । काय हे न कळे पाप यांचे ॥१॥
पाय पंथे का हे न चलती वाट । कोण हे अदृष्ट कर्म बळी ॥धृपद॥
का हे पायावरी न पडे मस्तक । क्षेम का हस्तक न पवती ॥२॥
का या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥
तुका म्हणे कई जाऊनि मोटळे । पडेन हा लोळे महाद्वारी ॥४॥
अर्थ :
माझे डोळे पंढरी या क्षेत्राला का पाहात नाहीत काय माझ्या डोळयांचे पाप आहेत ते मला काही समजत नाही. माझे पाय पंढरीची वाट का बरे चालत नाही असे कोणते यांचे अदृष्ट आणि बलवत्तर पाप आहे हे मला काही समजेना. माझे मस्तक विठोबाच्या पायावर का पडत नाहीत माझे दोन्ही हात विठोबाला क्षेम आलिंगन देण्यासाठी का पुढे होत नाहीत ? माझ्या इंद्रियांची वासना पूर्ण का होत नाही का बरे माझी वाणी विठोबाचे किर्ती वर्णन करुन पवित्र होईना ? तुकाराम महाराज म्हणतात, केव्हा माझ्या देहाचे मोटाळे पंढरीला जाऊन पडेल आणि केव्हा ते महाद्वारामधे लोळण घेईल ?
