वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079648 · अभंग क्र. ३५५०

3550.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
सीण भाग हरे तेथींच्या निरोपे । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥
इंद्रियांची धाव होईल कुंटित । पावेल हे चित्त समाधान ॥धृपद॥
माहेर आहेसे लौकिकी कळावे । निढळ बरवे शोभा नेदी ॥२॥
आस नाही परी उरी बरी वाटे । आपले ते भेटे आपणासी ॥३॥
तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊ नेदी ॥४॥

अर्थ :
देवाने पाठविलेल्या निरोपाने माझा सर्व शीणभार हरणार आहे आणि देवाचे रुप पाहिले की माझी काही इच्छाच मागे राहाणार नाही. इंद्रियांचे सर्व धावाधाव कुंठीत होईल आणि चित्त समाधानी पावेल. देवा तू मला माझ्या निरोपाचे उत्तर पाठव आणि लोकांना कळू दे की मला देखील माहेर आहे मला असे मोकाट टाकणे हे शोभणारे नाही. देवा मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही परंतू आपलीच माणसे आपल्याला जर भेटली तर मग बरे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुमच्याविषयी अवीट आवड आहे त्यामधे तातडीने खंड पडेल असे काही तुम्ही होऊ देऊ नका.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग