जाऊनिया माळीं नामा त
3583.
जाऊनिया माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥
देऊनि कापड सुखे आला घरां । सर्व समाचारा विदित केले ॥२॥
धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरी कापड दिले ॥३॥
आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनी पहावा हस्त त्याचा ॥४॥
