(पंढरीस जाणाऱ्या वार
3571.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
किती करू शोक । पुढे वाढे दुःखे दुःख ॥१॥
आता जाणसी ते करी । माझे कोण मनी धरी ॥धृपद॥
पुण्य होते गाठी । तरि का लागती हे आटी ॥२॥
तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥
अर्थ :
देवा आता मी तुझ्यासाठी किती शोक करु पुढे दु:खाने दु:ख वाढतच आहे. परंतू देवा आता तुला जे समजते ते तू कर पण हे लक्षात ठेव की तुझ्यावाचून माझ्या अंत:करणातील इच्छा कोण मनावर धरणार आहे ? देवा माझ्या पदरात जर एवढे पुण्य असते तर मला एवढया आटाआटी का कराव्या लागल्या असत्या ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या अंगी तर कोणते सामर्थ्य तर नाही परंतू तुझी व माझी भेट व्हावी एवढीच माझी तळमळ बाकी राहिली आहे.
