रात्रंदिवस मनी करीतस
3576.
रात्रंदिवस मनी करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझे ॥१॥
माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥
चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आता गति नामयाची ॥३॥
येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनी । एका जनार्दनी काय करु ॥४॥
