मालधनी घेउनी आलो असे
3591.
मालधनी घेउनी आलो असे घरा । तुम्ही का दातार शिव्या देता ॥१॥
द्रव्याचा मालक आणूनिया घरी । ठेविला निर्धारी काय भय ॥२॥
चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देता गणोबासी घेउन येतो ॥३॥
एका जनार्दनी दामा पुढे आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥
