उभयतां काकुलती येती
3560.
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करु फजिती ॥१॥
आम्हा आले वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥
व्यापाराचा नाही धाक । सुखे बैसशी तू देख ॥३॥
अन्नवस्त्र नाही घरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥