(पंढरीस जाणाऱ्या वार
3560.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥
जरि तू होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥धृपद॥
येथे न करी काम । मुखे नेघे तुझे नाम ॥२॥
तुका म्हणे कुळ । तुझे बुडवीन समूळ ॥३॥
अर्थ :
देवा तुझी चहाडी मी सर्वत्र करीन आणि तू आतापर्यंत प्राप्त करुन घेतलेली तुझी किर्ती मी सर्व बुडवून टाकीन. देवा तू जर अशी आशा अपेक्षा बुडवित असशील आणि माझ्याविषयी उदास होत असशील तर मीही तुझे वाटोळेच करीन. मग मी देवा येथे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही व तुझे नाम मी कधीही माझ्या मुखाने घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू जर माझ्याविषयी उदास राहिलास तर मी कूळ समूळ बुडवून टाकीन.
