वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079673 · अभंग क्र. ३५८२

3582.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
होईल माझी संती भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनी बैसे ॥१॥
शृंगारूनि माझी बोबडी उत्तरे । होतील विस्तारे सांगितली ॥धृपद॥
क्षेम आहे ऐसे होईल सांगितले । पाहिजे धाडिले शीघ्र मूळ ॥२॥
अवस्था जे माझी ठावी आहे संता । होईल कृपावंता निरोपिली ॥३॥
तुका म्हणे सवे येईल मुऱ्हाळी । किंवा काही उरी राखतील ॥४॥

अर्थ :
माझ्याविषयी नारायणाच्या मनामध्ये अगदी चांगली प्रकारची भावना ठसेल अशीच करुणा संतांनी माझ्याविषयी नारायणाजवळ भाकली असेल. पत्रामध्ये मी जे काही बोबडे शब्द लिहिले आहेत त्या शब्दांना श्रृंगारिक करुन अगदी व्यवस्थितपणे संतांनी देवाजवळ त्या शब्दाचा विस्तार करुन सांगितला असेल. माझा क्षेम समाचार संतांनी देवाजवळ सांगितलाच असेल परंतू मला बोलावण्यासाठी लवकरच मूळ धाडावे लागेल असेही देवाला संतांनी सांगितले असेल. सध्या माझी अवस्था कशी आहे हे संतांना चांगल्याच प्रकारे माहितच आहे व माझ्या अवस्थेविषयी संतांनी कृपावंत हरीच्याजवळ निरोप देखील दिला असेल. तुकाराम महाराज म्हणतात, वारकरी परत येत असताना देवाने वारकऱ्यांबरोबर मला नेण्यासाठी कोणीतरी मुरारी पाठविलाच असेल किंवा काही दिवस थांब असा निरोप तरी पाठविला असेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग