त्रिवर्ग भोजना बैसले
3580.
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥
नाम्या किती शिकविता नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥
घेऊनि कापड जाई बाजारासी । तेणे वडिलांसी समाधान ॥३॥
नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनी आण वाहातसे ॥४॥
