वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079651 · अभंग क्र. ३५७६

3576.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाही डोळा ॥१॥
वाट पाहे आस धरूनिया जीवी । निढळा हे ठेवी वरी बाहे ॥धृपद॥
बोटावरी माप लेखितो दिवस । होतो कासावीस धीर नाही ॥२॥
काय नेणो संता पडिला विसर । की नव्हे सादर मायबाप ॥३॥
तुका म्हणे तेथे होईल दाटणी । कोण माझे आणी मना तेथे ॥४॥

अर्थ :
माझ्या माहेरावरुन मला काय निरोप येतो या विचारानेच माझ्या डोळयाला झोप नाही. पंढरपूरहून माझ्या माहेराहून काही निरोप येतो की काय याची वाट मी पाहात आहे व माझ्या जीवाला तीच आशा लागली आहे व पंढरीवरुन काही निरोप येतो की काय याची मी वाट माझ्या कपाळावर हात ठेवून पाहात आहे. मी सारखे बोटावर दिवस मोजत आहे माझा अगदी जीव कासावीस होतो आहे आणि धीर तर धरवतच नाही. मी संतांजवळ पत्र दिले होते ते पत्र संत माझ्या मायबापाला दयायला विसरले की काय किंवा माझे मायबाप ते पत्र घेण्यास सादर नव्हते की काय हे मला काही कळेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मायबापाजवळ भक्तांची खूप गर्दी झाली असेल त्यामुळे त्या गर्दीमध्ये माझे कोण मनावर घेणार आहे ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग