ऐकोनिया देव नाम्यासी
3579.
ऐकोनिया देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगी ॥१॥
तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥
लौकरी नामया यावे परतोनी । ऐसे चक्रपाणी बोलतसे ॥३॥
एका जनार्दनी ऐसे बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वता घरी आला ॥४॥
