(पंढरीस जाणाऱ्या वार
3574.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता हे सेवटी । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आता द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥धृ॥
आता करकर । पुढेन करी उत्तर ॥२॥
तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥
अर्थ :
देवा आता ही माझी शेवटची गोष्ट तुम्ही ऐकावी. देवा मी तुम्हाला पाठविलेल्या निरोपाचे जसे तुम्हाला उत्तर देता येईल तसे तुम्ही दयावे. देवा आता मी तुझ्याशी यापुढे एकही शब्द बोलणार नाही किंवा तुझ्याशी किरकिर मी घालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्वत्र तुझा जसा ठसा आहे तो तसाच राखून ठेव म्हणजे पुरे.
