वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079526 · अभंग क्र. ३५५९

3559.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
जोडी कोणांसाठी । एवढी करितोसी आटी ॥१॥
जरी हे आम्हा नाही सुख । रडो पोरे पोटी भूक ॥धृपद॥
करूनि जतन । कोणा देसील हे धन ॥२॥
आमचे तळमळे । तुझे होईल वाटोळे ॥३॥
घेसील हा शाप । माझा होऊनिया बाप ॥४॥
तुका म्हणे उरी । आता न ठेवी यावरी ॥५॥

अर्थ :
देवा अरे तू भक्तांकडून एवढे ऋण कशासाठी गोळा करतोस एवढे कष्ट का करतोस कोणासाठी एवढे तू ऋण गोळा करुन ठेवत आहेस ? अरे देवा तू एवढे धन गोळा करतो ते कशासाठी जर तुझे लेकरच सुखी नाहीत पोटात भूक असल्यामुळे ते रडते आहे मग त्या धनाचे तू काय करणार आहेस ? अरे देवा तू हे धन जतन करुन देशील तरी कोणाला ? परंतू हे देवा तू आम्हाला तळमळ करायला लावतोस आमच्या तळमळीने तुझे वाटोळेच होईल देवा तू आमचा बाप झाला आहेस खरा परंतू आमच्या लेकरांचा तू शापच घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू आता तुझ्याजवळ काहीही शिल्लक ठेवू नकोस सर्व काही आम्हाला देवून टाक.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग