वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079623 · अभंग क्र. ३५६६

3566.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
रुळे महाद्वारी । पायाखालील पायरी ॥१॥
तैसे माझे दंडवत । निरोप सांगतील संत ॥धृपद॥
पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥
तुका म्हणे बाळ । लोळे न धरिता सांभाळ ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्या महाद्वारातील पायाखालील जी पायरी आहे, ती पायरी जशी रुळलेली आहे अगदी त्याप्रमाणे माझा दंडवत आहे मी संतांकडे माझा निरोप पत्ररुपाने तुमच्याजवळ पाठविला आहे तो निरोप संत तुम्हाला सांगतील. दंड किंवा काठी ही कशी एकदम जमिनीवर पडते अगदी तसाच मी लोटांगण घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, लहान बाळ देहाचा सांभाळ न धरता जसे लोळण घेते अगदी तसा मी लोळण घेत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग