वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079539 · अभंग क्र. ३५६३

3563.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
कैचा मज धीर । कोठे बुद्धि माझी स्थिर ॥१॥
जे या मनासी आवरू । आत पोटी वाव धरू ॥धृपद॥
कैची शुद्ध मति । भांडवल ऐसे हाती ॥२॥
तुका म्हणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥३॥

अर्थ :
देवा मला कसला धीर आहे मला तर धीरच नाही माझी बुध्दी तरी कोठे स्थिर आहे ? जेणेकरुन मी माझ्या मनाला आवरु शकेल आणि माझ्या अंत:करणामधे वाव धरु शकेन. देवा माझी बुध्दी तरी एवढी शुध्द कोठे आहे आणि माझ्या हाती विवेक आणि वैराग्य हे भांडवल तरी कोठे आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे या गोष्टीमुळे माझी कशी दशा झाली आहे हे तुला कसे सांगावे ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग