वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079451 · अभंग क्र. ३५४५

3545.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
विनवीजे ऐसे भाग्य नाही देवा । पायाशी केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणे पत्र लिहिले आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥धृपद॥
जेथे देवा तुझा न कळेचि पार । तेथे मी पामर काय वाणू ॥२॥
जैसे तैसे माझे बोल अंगीकारी । बोबडा उत्तरी गौरवितो ॥३॥
तुका म्हणे विटेवरी जी पाउले । तेथे म्या ठेविले मस्तक हे ॥४॥

अर्थ :
हे देवा तुझ्या पायाजवळ विनंती करावी एवढे देखील भाग्य माझे नाही परंतू हे केशवा तरी देखील मी तुझ्या पायाशी सलगी केली आहे. देवा मी धीटपणाने परंतू आवडीने तुम्हाला पत्र लिहिले आहे तुमचा अंत:पार माझ्या अल्पबुध्दीला कळत नाही. अहो देवा जेथे वेदाला तुमचा अंत:पार कळत नाही तेथे मी पामराने तुमच्याविषयी काय वर्णन करावे. देवा मी ज्या शब्दाने तुमचे गौरव करील ते शब्द जसे असतील तसे तुम्ही त्याचा अंगीकार करा बोबडया शब्दाने का होईना परंतू मी तुमचे गुण गौरव करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर जी पाऊले आहेत त्या पावलांवर मी मस्तक ठेवले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग