द्वारकेहुनी विठु पंढ
3554.
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥
दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देई आम्हा देवा भक्तराशी ॥२॥
तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥
एका जनार्दनी परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥
