वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079591 · अभंग क्र. ३५६५

3565.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
येती वारकरी । वाट पाहातो तोवरी ॥१॥
घालूनिया दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥धृपद॥
पत्र हाती दिले । जया जेथे पाठविले ॥२॥
तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥

अर्थ :
पंढरीहून वारकरी येतीलच तोपर्यंत मी वाट पाहात राहीन. मग आलेल्या वारकऱ्यांना मी दंडवत घालीन आणि माझ्यासाठी माझ्या विठोबाने काही निरोपाची गोष्ट तुमच्याजवळ सांगितली आहे की काय असे मी त्यांना विचारीन. वारकऱ्यांच्या हाती मी पत्र दिले होते आणि ते देवाजवळ पाठविले होते. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा की वारकरी पंढरीहून परत आले की मी त्यांच्यासमोर जाईन आणि त्यांना विचारेन की माझ्यासाठी विठोबाने काही निरोप पाठविले आहे की काय असे मी त्यांना विचारेन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग