वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079401 · अभंग क्र. ३५८५

3585.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
नाही हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करू ॥१॥
पुसाविसी वाटे मात कापडिया । पाठविती न्याया मूळ मज ॥धृपद॥
आणीक या मना नावडे सोहंळा । करिते टकळा माहेरींचा ॥२॥
बहु कामे केले बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाही ॥३॥
तुका म्हणे त्याचे न कळे अंतर । अवस्था ते फार होते मज ॥४॥

अर्थ :
मी काही जरी केले नाही तरी माझी काही हानी होणार नाही हे निश्चिंत आहे पण मला माझ्या माहेरचा विसर पडत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना केवळ मला एकच विचारावेसे वाटते ते म्हणजे जे माझे मायबाप मला न्यावयासाठी मूळ पाठविणार आहेत की काय ? दुसरा कोणताही सोहंळा मनाला आवडत नाही केवळ माहेरच्याच गोष्टी मन करत आहे. मी संसारातील कामे खूप दिवस झाले तसे करतो आहे त्यामुळे खूप कासावीसही झालो आहे आणि माझ्या आईबापाची भेट मला खूप दिवस झाले तसे आमच्या दोघाची गाठभेटच झाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या मनात नेमका काय आहे ते काही नेमके कळत नाही परंतू माझ्या मनाला तर फार तळमळ लागत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग