(पंढरीस जाणाऱ्या वार
3575.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
बोलिलो ते आता । काही जाणता नेणता ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥धृपद॥
स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥२॥
तुका म्हणे लाड । दिला तैसे पुरवा कोड ॥३॥
अर्थ :
देवा मी तुम्हाला ज्ञान अज्ञानात जे काही आता बोललो आहे, त्या अन्यायाबद्दल हे पाडूरंगे माझी माय मला क्षमा करावी. देवा मी आतापर्यंत तुझी जी स्तुती किंवा निंदा केली ती तू सहन कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आतापर्यंत तुम्ही माझा जसा लाड केला तसेच माझे कोडकौतुकही पूर्ण करा.
