वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079652 · अभंग क्र. ३५५५

3555.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
निरोपासी वेचे । काय बोलता फुकाचे ॥१॥
परी हे न घेवेचि यश । भिऊ नको सुखी आस ॥धृपद॥
सुख समाधाने । कोण पाहे देणे घेणे ॥२॥
न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥

अर्थ :
देवा तू जर चार निरोपाचे शब्द पाठवले असते तर तुझे काही खर्च झाले असते काय ? तुला चार शब्द पाठवण्याचा देखील श्रेय घ्यायचा नसेल तर ठीक आहे नको घेऊ यापुढे मला तू भिऊ देखील नको तू तुझ्या ठिकाणी सुखी राहा. जो सुखी आणि समाधानी असेल तो दुसऱ्याचे घेणे देणे कशाला पाहात बसेल ? तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा निरोप पाठवण्यासाठी किंवा चार शब्द बोलण्यासाठी तुझे काही खर्च होणार नाही तेवढे तरी काम तू कर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग