तिसरे अवतारीं नामा उ
3553.
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पै जाहला ॥१॥
ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणे चुकविले शापबंधासी ॥२॥
भागवत मथितार्थ स्वये सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥
यापरी दास्यत्व तेथे निकट केले । एका जनार्दनी म्हणे वंदूं त्यांचीं पाउले ॥४॥
