वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079490 · अभंग क्र. ३५९०

3590.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
काय करावे म्या केले ते विचार । घडेल साचार काय पाहो ॥१॥
काय मन नाही धरीत आवडी । प्रारब्धी जोडी तेचि खरी ॥धृपद॥
काय म्या तेथींचे रांधिले चाखोनि । ते हे करी मनी विवंचना ॥२॥
आणीक ही त्यासी बहुत कारणे । बहु असे जिणे ओढीचे ही ॥३॥
तुका म्हणे आम्हा बोळविल्यावरी । परती माघारी केली नाही ॥४॥

अर्थ :
अहो मी कोणताही विचार केला तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण कोणताही विचार मी जरी केला तरी तो कोठे सत्य झाला आहे. अहो मन कोणत्या गोष्टीचे आवड धरीत नाही आणि आवडती वस्तू लगेचच भेटेल असेही नाही पण प्रारब्धाने जे मिळेल तेच खरे आहे. दूर कोठेतरी स्वयंपाक झाला आणि मी येथे बसून ते अन्न खाल्ले असे होऊ शकते काय तर नाही परंतू मन येथे बसून त्या स्वयंपाकाची विवंचना करते स्वयंपाक कसा झाला असेल किंवा त्याची चव कशी असेल असे विचार मन करते. त्यामुळेच माझ्या मनात आले की माझ्या मायबापाला खूप कामे आहेत मला मूळ पाठवण्याचे एवढे एकच काम त्यांच्याकडे नाही त्यांचे जगणे हे खूप ओढाताणीचे आहे त्यामुळे त्यांनी मला मूळ पाठविला नसेल. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा या पाडूरंगाने आम्हाला इकडे पाठविल्यानंतर पुन्हा पंढरीला बोलावलेच नाही कारण त्यांच्या मागे खूप कामे आहेत असे मला वाटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग