वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079497 · अभंग क्र. ३५६४

3564.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
समर्पक वाणी । नाही ऐकिजेसी कानी ॥१॥
आता भावे करूनि साचा । पाया पडिलो विठोबाच्या ॥धृपद॥
न कळे उचित । करू समाधान चित्त ॥२॥
तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्ती ॥३॥

अर्थ :
अहो देवा माझी वाणी एवढी समर्पक नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या कानाने ऐकावीशी वाटत नसावी. आता मी माझा भक्तीभाव अगदी खरा केला आहे आणि विठोबाच्या पाया पडलो आहे. देवा तुमच्या चित्ताचे समाधान कशाने होईल व त्यासाठी योग्य उचित असे काय आहे तेच मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुम्हाला जी विनंती केली आहे तेवढी माझी विनवणी तुम्ही तुमच्या चित्तात धरा म्हणजे झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग