वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079532 · अभंग क्र. ३५४४

3544.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता पंथ पाहे माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥
काय करू आता न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥धृपद॥
घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुले ते झुरे पाहावया ॥२॥
तुका म्हणे जीव गेला तरी जावो । धरिला तो देव भाव शुध्द ॥३॥

अर्थ :
आता मी पाठवलेल्या माझ्या माहेरच्याकडे निरोपाची वाट पाहात राहीन मागे प्रपंचाच्या कामाचा कितीही राडा पडो कितीही त्याचा भोगवाटा होवो तो खुशाल होऊ देईन. आता काय करावे या संसारामध्ये मला आता राहावेसे वाटत नाही कारण या संसारामध्ये मी खूप दिवसापासून खूप त्रास सहन केला आहे. घर पाठीमागे लागले आहे चित्ताला उभे वारे सुटले आहे प्रिय मायबापाना पाहाण्यासाठी मन झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाविषयी जो शुध्दभाव मनामध्ये धरला आहे तो तसाच टिकून राहो मग जीव गेला तरी जावो त्याविषयी अजिबात चिंता नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग