याचिये संगतीं दु:खाच
3566.
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥
आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥
येणे आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥
एका जनार्दनी ऐशियाची माव । न येता नामदेव कींव भाकी ॥४॥
