वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079826 · अभंग क्र. ३५४७

3547.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काय झाले नेणो माझिया कपाळा । न देखीजे डोळा मूळ येता ॥१॥
बहु दिस पाहे वचनासी वास । धरिले उदास पांडुरंगा ॥धृपद॥
नाही निरोपाचे पावले उत्तर । ऐसे तो निष्ठूर न पाहिजे ॥२॥
पडिला विसर किंवा काही धंदा । याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥
तुका म्हणे आले वेचाचे साकडे । देणे घेणे पुढे तोही धाक ॥४॥

अर्थ :
माझ्या माहेराहून पंढरीहून मला मूळ येताना दिसणार नाहीये हेच माझ्या नशिबी आहे काय माहित माझ्या नशिबाला नेमके झाले तरी काय तेही मला काही कळनासे झाले आहे. पाडूरंगाकडून काहीतरी निरोपाची वाट येईन अशी मी अपेक्षा धरुन बसलो आहे परंतू पाडूरंगानेच माझ्याविषयी उदासिनता धरलेली आहे. मी कितीही पाडूरंगाला उत्तर पाठविले तरी त्याच्याकडून काही मला उत्तर येत नाही परंतू हे पाडूरंगा इतकेही पाडूरंगाने निष्ठूर नसावे. मला काही उत्तर न पाठवायचे कारण म्हणजे पाडूरगाला माझा विसर पडलाय काय कि काही महत्वाचे काम त्याच्याकडे आले आहे हे मला काही कळेनासे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे नुसते तुला निरोप पाठवले तर त्याचे उत्तर पाठवण्याचे साकडे तुला वाटते आहे तर मग पुढे देण्याघेण्याचा धाक तर तुला वाटतच असेल असे मला वाटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग