वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079336 · अभंग क्र. ३५४६

3546.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनी ॥१॥
पातकांच्या रासी नासितोसी नामे । जळतील कर्मे महा दोष ॥धृपद॥
सर्व सुखे तुझ्या वोळंगती पायी । रिद्धी सिद्धी ठायी मुक्तिचारी ॥२॥
इंद्रासी दुर्लभ पाविजे ते पद । गीत गाता छंद वाता टाळी ॥३॥
तुका म्हणे जड जीव शक्तीहीन । त्यांचे तू जीवन पांडुरंगा ॥४॥

अर्थ :
देवांच्याही देवा गोपिकांच्या पती तुझी त्रिभूवनामध्ये तू उदार आहे अशी ख्याती आहे. देवा तुझ्या नामाने तू अनेक पातकांच्या राशी नाहीशा करुन कर्मे व महादोष जाळून टाकतोस. देवा सर्व सुखे तुझ्या पायाजवळ लोटांगण घेतात आणि रिध्दी सिध्दी व चारही मुक्ती तर तुझ्या पायाच्या ठिकाणीच आश्रय घेतात. इंद्रादेवाला जे पद दुर्लभ आहे ते पद हरीचे नाम गीतात गाताना व त्या छंदामध्ये टाळी वाजविल्यानंतर प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू जड जीवाचा व शक्तीहीन असलेल्या जीवांचे जीवन आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग