(पंढरीस जाणाऱ्या वार
3568.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
होईल कृपादान । तरी मी येईन धावोन ॥१॥
होती संतांचिया भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥धृपद॥
रिघेन मातेपुढे । स्तनपान करीन कोडे ॥२॥
तुका म्हणे ताप । हरती देखोनिया बाप ॥३॥
अर्थ :
तुम्ही जर माझ्यावर कृपादान केले तर धावतच देवा मी तुमच्याकडे येईन. मग मी पंढरीक्षेत्राला आलो तुमच्याकडे धावत आल्यानंतर संतांच्या व माझ्या गाठीभेटी होतील व आम्ही दोघे आनंदाने वाळवंटात नाचू. मग मी माझ्या मातेपुढे विठाईपुढे जाईन व कौतुकाने तिचा प्रेमरुपी स्तनपान करीन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बापाला म्हणजे विठूरायाला नुसते पाहिले तरी सर्व पाप क्षणात नाहीसे होतात.
