याचिया छंदा जे पै ला
3564.
याचिया छंदा जे पै लागले । निर्मूलन केले त्यांचे येणे ॥१॥
बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥
हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्ती पाहतसे ॥३॥
एका जनार्दनी याचा छंद नाही बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥
