वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079690 · अभंग क्र. ३५७९

3579.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरी जाऊनिया ॥१॥
करूनिया दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्ते ॥धृपद॥
होतील दाटले सद्गदित कंठी । भरते त्या पोटी वियोगाचे ॥२॥
येरयेरा भेटी क्षेम आलिंगने । केली समाधान होती संती ॥३॥
तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परतोंनी ॥४॥

अर्थ :
आज आषाढीपौर्णिमा आहे गोपाळपूरचा कालाही झाला असेल माझ्या वारकऱ्यांनी विठोबाच्या देवळात जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्याचा निरोपही घेतला असेल. माझ्या वारकऱ्यांनी दहीभाताचा काला व मंगळभोजन केले असेल आणि शुभ मुर्हूत पाहून पंढरीतून ते मागे फिरतील. आपल्याला आता पंढरीतून मागे फिरावे लागेल या विचाराने वारकऱ्यांचे कंठ सद्गतीत झाले असेल व या विचारानेच त्यांचे कंठ दाटून आले असतील हरीचा व आपला वियोग होईल या विचारानेच त्यांच्या पोटामध्ये भरते आले असेल. देवाने व संतानी एकमेकांना क्षेम आलिंगन दिले असेल आणि एकमेकांचे समाधान केले असेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वारकऱ्यांना पुन्हा मागे फिरुन घराकडे येताना सहन होत नसेल पुन्हा पुन्हा ते मागे वळून देवाच्या देवळाचा कळस पाहात असतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग