वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079685 · अभंग क्र. ३५६९

3569.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥
जरी तू होसी कृपावंत । तरि हा बोलावी पतित ॥धृपद॥
नाणी काही मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥
तुका म्हणे नाही । काय शक्ती तुझे पायी ॥३॥

अर्थ :
हे देवा मी तुला पाठवलेल्या निरोपाचे पत्र तू वाच आणि त्वरेने मला त्याचा जाब तुम्ही दयावा. देवा तू जर कृपावत माझ्याविषयी झालास तर तू मला नक्कीच पंढरीला बोलावणे पाठवशील. देवा माझ्याविषयी आता काहीही मनात आणू नकोस माझ्या पापाचा नाश तू कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायामधे अशी कोणती शक्ती नाही की जे तू करु शकत नाहीस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग