वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकऱ्या बरोबर पत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079408 · अभंग क्र. ३५९२

3592.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
बहु दिस नाही माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसाये ॥१॥
आपुल्याला होतो गुंतलो व्यासंगे । नाही त्या प्रसंगे आठवले ॥धृपद॥
तोडिले तुटते जडती जडले । आहे ते आपुले आपणापे ॥२॥
बहु निरोपाचे पावले उत्तर । जवळीच फार एक ते ही ॥३॥
काय जाणो मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥

अर्थ :
खूप दिवस झाले माझ्या माहेरची माझ्या आईबापाची व माझी भेटच झाली नाही कारण मी संसारात गुंतलो होतो व संसारातील व्यवसायामुळे आमच्या दोघामध्ये तूट निर्माण झाली होती. मी संसारात व कामधंदयात गुंतलो होतो त्यामुळे आपल्या मायबापाची व आपली भेट व्हावी हे त्याप्रसंगी आठवलेच नाही. कोणतेही संबंध तोडले तर तुटतात जोडले तर जोडले जातात या सर्व गोष्टी आपल्या मनावरच परावलंबीत असतात. यापूर्वी देवाकडून मला खूप निरोप आले तेवढे एकच उत्तर माझ्याजवळ आहे परंतू मी संसारात गुंतलो त्यामुळे मला काही त्याच्याकडे जाता आले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी संसारामध्ये खूप गुंतलो होतो त्यामुळे खूप दिवस झाले तसे माझ्या माहेरची व माझ्या मायबापाची भेट काही घडली नाही त्यामुळे त्यांनी माझ्यावर प्रेम करायचेच टाकून दिले आहे की काय हे मला काही कळेना.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग