(वारकऱ्या बरोबर पत्र
3586.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले ॥१॥
कोणाचिया मुखे तंट नाही मागे । वचन वाउगे बोलो नये ॥धृपद॥
दिसे हानि परी निरास न घडे । हे तव रोकडे अनुभव ॥२॥
आपुलिया भोगे होईल उशीर । तोवरी का धीर केला नाही ॥३॥
तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायी आहे ॥४॥
अर्थ :
देवाला पाठविलेल्या निरोपाचे जोपर्यंत मला उत्तर कळत नाही तोपर्यंत मी देवाचा निषेध तरी कसा करावा बरे ? मी अजून कोणाच्या मुखाने देवाविषयी तंटा करताना ऐकले नाही मग मीच देवाविषयी वावगे बोलू नये असे मला वाटते. मी पाठवलेल्या निरोपाचे अजूनही मला उत्तर मिळाले नाही ही हानी प्रत्यक्ष दिसत आहे परंतू निराश होऊन चालणार नाही देव खूप चांगला आहे या गोष्टीचा मला समोरच चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. आपल्या प्रारब्ध भोगामुळेच आपल्याला फळ मिळण्यास थोडा उशीर लागणारच आहे तर मग तोपर्यंत आपण धीर का धरु नये ? तुकाराम महाराज म्हणतात, देव शेवट गोडच करणार आहे यामागेही त्याने अनेक भक्तांचा उध्दार केला आहे ही गोष्ट मला माहित आहे.
